रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

गरज स्वयंपूर्ण खेड्यांची

            भारत हा विकसनशील देश असून विकसित होण्याकडे देशाचा प्रवास सुरू आहे. आपल्या देशाचा विचार करता 70% पेक्षा जास्त लोक हे खेड्यात राहतात आणि 30% पेक्षा कमी लोक शहरात राहतात परंतु सेवा सुविधांचा विचार करता मात्र आज खेड्यांच्या तुलनेत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सेवा सुविधा दिल्या जात आहेत. मुळात खेड्याचे चित्र सध्या बदलत चालले आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. प्रमुख उद्योग शेती हा संकटात आला आहे. कमी उत्पन्नामुळे आज खेड्यातून शहराकडे स्थलांतरितांचे प्रमाण वाढताना दिसत आहे, त्यामुळे शहरातल्या सुविधांवरील ताण वाढू लागला आहे व खेडी ओस पडू लागली आहेत. स्वयंपूर्ण खेड्यांची संकल्पना ही एक आदर्शवादी दृष्टी नाही, तर आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याचा एक मार्ग आहे असे म्हणावे लागेल. 

            21व्या शतकात देश पुढे जात असताना ग्रामीण समुदायांची अंगभूत शक्ती ओळखणे आणि त्याचा उपयोग करणे हे आज आवश्यक आहे. खेडी स्वयंपूर्ण होण्यामध्ये केवळ सरकारी योजनांवर अवलंबून न राहता स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वतःच्या विकासाची आणि कल्याणाची जबाबदारी स्वतः घेणे अपेक्षित आहे. सरकारी योजना चांगल्या आहेत, परंतु त्या राबवणार्‍या यंत्रणेबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. खेडी ही अलिप्त संस्था नसून परस्परांशी जोडलेली केंद्रे आहेत, जी स्थानिक संसाधने आणि सामुदायिक सहकार्याने भरभराटीस येऊ शकतात. बाह्य संसाधनांवरील अवलंबित्व कमी करणे आणि आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय शाश्वतता वाढवताना गावांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम करणे, आज अत्यंत आवश्यक ठरत आहे.

            वाढती लोकसंख्या हा विकासातला अडथळा असला तरी योग्य माणसाला योग्य काम मिळाले तर हीच वाढती लोकसंख्या आपले बलस्थान बनू शकेल. संपूर्ण जगात तरुणांची जास्त संख्या असणारा आपला देश आहे. त्यामुळे तरुणांच्या शक्तीचा जर आपण सकारात्मक उपयोग करून घेतला तर आपल्या देशाचे भवितव्य निश्चितच उज्वल असणार आहे, परंतु जर त्यांना आपण हे काम देऊ शकलो नाही, रोजगार देऊ शकलो नाही तर हीच शक्ती चुकीच्या मार्गाला जाऊ शकते. बेरोजगारीतून अनेक सामाजिक, आर्थिक प्रश्न निर्माण होऊ शकतात. शेती हा ग्रामीण भारताचा कणा आहे. त्यामुळे त्याचा पद्धतशीर विकास फार आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीला चालना देणे, पीक विविधीकरण, जलसंधारण तंत्र या सर्वाला येथे महत्त्व आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच पारंपरिक शहाणपणाचाही उपयोग करणे येथे आवश्यक ठरेल.

            खेड्यांमध्ये पर्यावरणीय समतोल राखून शेतीची उत्पादकता वाढवली पाहिजे. शिवाय प्रक्रिया उद्योग आणि सहकारी संस्था निर्माण होऊन कृषी आधारित उद्योगांचा विकास झाला तरच स्थानिक उत्पादनांमध्ये मोलाची भर पडेल, रोजगार निर्मिती होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. शाश्वत विकासासाठी खेड्यातील युवकांना संबंधित कौशल्य आणि उद्योजकतेच्या संधीसह सक्षम करणे आज आवश्यक आहे. व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवून गावकऱ्यांना शेतीच्या पलीकडे उपजीविकेचे विविध पर्याय सांगणे आवश्यक आहे. त्याविषयीचे ज्ञान आणि कौशल्ये त्यांना दिली पाहिजेत.

            महात्मा गांधी यांनी दूरदृष्टीने ‘खेड्याकडे चला’ अशी हाक दिली होती, त्याची आज प्रकर्षाने आठवण होते. जोपर्यंत आपण खेड्यांचा विकास करू शकत नाही, तोपर्यंत आपण विकसित भारताचे स्वप्नच बघू शकणार नाही. खेडी विकसित करायची असतील तर ती स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. आज राळेगणसिद्धी किंवा हिवरेबाजार सारख्या खेड्यांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. अशी विकासाची मॉडेल्स तयार करून त्यानुसार नियोजित विकासाची गरज आहे. निसर्गाने आपणास भरभरून दिले आहे, परंतु त्याचा वापर मात्र आपण चुकीच्या पद्धतीने करत आहोत. नैसर्गिक साधन संपत्तीचा आपण अतिरेकी वापर करत असल्याने किंवा त्याच्या वापराच्या अज्ञानामुळे आपण विकास साधू शकत नाही. या साधनसंपत्तीचा जर आपण सुयोग्य आणि महत्तम वापर करू शकलो, तरच खेडी स्वयंपूर्ण होतील. आज खेड्यांमधील चुकीच्या मार्गाने चालणारे राजकारण, भ्रष्टाचार, बेरोजगारी, व्यसनाधीनता हे विकासातले फार मोठे अडथळे आहेत. ग्रामीण भागात चांगले नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे. तरुणांनी गलिच्छ राजकारण न करता, समाजोपयोगी राजकारण करण्याची गरज आहे.

            खेडेगावातील उद्योगधंदे आधुनिक पद्धतीने, नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित करून गावातच रोजगार निर्माण केला पाहिजे. डिजिटल युगात, ग्रामीण आणि शहरी भागातील दरी कमी करण्यासाठी इ-गव्हर्नन्स, टेली मेडिसिन आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म यांचा सुयोग्य वापर केला पाहिजे. दर्जेदार आरोग्यसेवा आणि दर्जेदार शिक्षण खेड्यांमध्ये उपलब्ध झाल्यास नक्कीच खेड्यांचा विकास होणार आहे. 1965 सारखी पुन्हा एकदा हरितक्रांती झाली पाहिजे, त्यासाठी शेतीवर मोठ्या प्रमाणात संशोधनही झाले पाहिजे. केवळ पीक घेऊन चालणार नाही तर त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग गावातच निर्माण झाले पाहिजेत. आत्मनिर्भर भारतासाठी केवळ मोठे उद्योग महत्वाचे नसून सूक्ष्म, लघु व कुटीरोद्योग तेवढेच महत्वाचे आहेत. शेती व उद्योगांमधील गुंतवणूक वाढवण्याची आज गरज आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ सारखे कार्यक्रम गावागावात राबवून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवता येऊ शकतो.

स्थानिक उद्योगांचा विकास केला पाहिजे. प्रायोगिक शेतकरी किंवा उद्योजक यांना सरकारी पातळीवर बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले पाहिजे. शेती उत्पन्न वाढले, खेड्यांची अर्थव्यवस्था सुधारली की शहराकडे जाणाऱ्या माणसांचा लोंढा कमी होईल, तेथील सुविधांवरही त्याचा ताण पडणार नाही व खेडी ही स्वयंपूर्ण होतील आणि या खेड्यांचा विकास म्हणजेच तो देशाचाही विकास असेल. स्वयंपूर्ण गावे हा केवळ एक आदर्श नसून स्वावलंबी भारत निर्माण करण्याच्या दिशेने जाणारा व्यावहारिक रोडमॅप आहे. असंख्य खेडी जेव्हा स्वयंपूर्ण होतील तेव्हा नक्कीच ‘आत्मनिर्भर भारत’ हे स्वप्न सत्यात उतरेल.

रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

निश्चय फटाके मुक्त दिवाळीचा

        ज्या सणाची आपण सर्वजण लहान थोर मंडळी अगदी आतुरतेने वाट बघत असतो असा एक प्रकाशाचा, आनंदाचा सण म्हणजे दिवाळी.  विविधरंगी रांगोळ्या, पणत्या, आकाश कंदिल, विद्युत रोषणाई, फराळ, फटाक्यांची आतिषबाजी ही सर्व दिवाळी या सणांची वैशिष्टे आहेत.  आपल्या सर्व सणांवर, ते साजरे करण्याच्या पद्धतीवर नजर टाकली तर हे सर्व सण पर्यावरण पूरक असेच आहेत आणि जर तसे ते नसतील तर ते पर्यावरण पूरक साजरे करण्याची आपली जबाबदारी ठरेल. दिवाळी सणामध्ये असणारे फटाक्यांचे अविभाज्यपण असेच मनाला पटत नाही.   फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करणे हा पर्यावरणपूरक पर्याय आहे. आपण दिवे लावणे, पूजा करणे, मिठाई वाटणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे यासारख्या पारंपारिक विधींवर लक्ष केंद्रित करू शकतो. फटाक्यांचा वापर करून खरं तर आपण या सणाची शान कमी करतो. पर्यावरणाला हानी पोहोचवतो. दिवाळी सारख्या शांत उत्सवाला पणत्यांची रोषणाईच खरी शोभून दिसते, त्यामुळे या सणाचे मांगल्य, पावित्र्य अधिकच उठून दिसते.

फटाके हे मोठ्या प्रमाणात वायु आणि ध्वनी प्रदूषण करत असतात. फटाके जाळल्याने सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि कणिक पदार्थ यांसारखे प्रदूषक बाहेर पडतात, ज्यामुळे वायू प्रदूषणात भर पडते. फटाक्यांचा मोठा आवाज मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो, ज्यामुळे तणाव, चिंता आणि बहिरेपण येऊ शकते. फटाक्यांदरम्यान उत्सर्जित होणारे प्रदूषक श्वसनाच्या समस्या वाढवू शकतात, विशेषत: दमा किंवा श्वसनाच्या इतर समस्या असलेल्या व्यक्तींवर याचा खूप मोठा प्रभाव पडू शकतो. जळलेल्या फटाक्यांचे अवशेष आणि कचरा पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास हातभार लावतात, कारण त्यात बर्‍याचदा अविघटनशील पदार्थ असतात. फटाक्यांच्या वापरामुळे विविध अपघात आणि आगीचे धोके निर्माण होऊ शकतात आणि होत आहेत. आजपर्यंत अशा अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत याकडे आपण पद्धतशीर दुर्लक्ष करतो. आपण एकमेकांना ‘शुभ दीपावली’ अशा शुभेच्छा देतो, पण एखाद्याच्या हातून फटाके लावताना अचानक स्फोट होऊन गंभीर इजा झाली तर त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला ही दीपावली शुभ ठरेल का? किंवा निसर्गाला ही दीपावली शुभ ठरेल का? याचा विचार होण्याची गरज आहे.

तेजस्वी दिवे आणि मोठा आवाज वन्यजीवांना त्रास देऊ शकतात आणि विचलित करू शकतात, ज्यामुळे त्यांचे नैसर्गिक वर्तन बिघडू शकते आणि त्यांच्या अधिवासावरही परिणाम होऊ शकतो. बर्‍याच फटाक्यांमध्ये हानिकारक रसायने आणि जड धातू असतात, जे जाळल्यावर हवेत आणि मातीमध्ये विषारी पदार्थ सोडतात, ज्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यास धोका निर्माण होतो. फटाक्यांच्या उत्पादनामध्ये नूतनीकरण न करता येण्याजोग्या संसाधनांचा वापर समाविष्ट असतो, ज्यामुळे संसाधनांचा ऱ्हास आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो. फटाके तयार करताना आणि जाळताना हरितगृह वायूंचे उत्सर्जन हवामान बदलाला कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे एकूण पर्यावरण संतुलनावर परिणाम होतो याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.  

आपणास सुरक्षित, उत्साही, आनंदी, आरोग्यदायी दिवाळी साजरी करायची असेल तर फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे अत्यंत आवश्यक आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे कदाचित क्षणभर आपणास आनंद वाटत असेलही परंतु त्या आनंदात खोलवर कुठेतरी दु:ख लपलेले असेल तर असा आनंद काय कामाचा ? हा खरा प्रश्न आहे. त्यापेक्षा या मंगल सणामधून फटाके वजा करून त्या वाचलेल्या पैशामधून गरिबांना खाऊ वाटप, अन्न दान, अशा कितीतरी विधायक गोष्टी करता येतील. फटाक्यांचा वापर करून कुणाचे तरी नुकसान करण्यापेक्षा, पर्यावरणाची हानी करण्यापेक्षा फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा सर्वांनी निश्चय करून इतरांच्या आनंदात वाटेकरी होऊया असे वाटते. 

सोमवार, ३१ जुलै, २०२३

आर्टिफिशियल इंटेलिजन्स : नवे आव्हान

                आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाची चर्चा सर्वत्र जोर धरू लागली आहे. अनेक क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा सर्रासपणे वापर होऊ लागला आहे. एखादा शोध लागला की त्याचा चांगल्यासाठी उपयोग होतो तसा तो वाईटासाठी होण्याचीही शक्यता असते. अनेकदा इतका वाईट उपयोग होऊ शकतो, याचा त्या शोध लावणारऱ्या व्यक्तीनेही विचार केलेला नसतो. काही प्रवृत्ती या नेहमी एखाद्या चांगल्या गोष्टीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करत असतात. याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. आज आपल्याकडे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे नवीन तंत्रज्ञान आले आहे. त्याच्या फायद्यांचा विचार केला तर यामाध्यमातून मानव आपली प्रचंड प्रगती करू शकतो, परंतु त्याचे तोटे ही तितकेच धोकादायक आहेत, म्हणूनच त्याच्या तोट्यांचाही आपणास प्रथम विचार करावा लागेल.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा अभ्यास करताना त्याच्या फायद्यांपेक्षा मला त्याच्या तोट्यांवरच ब्लॉग लिहिण्याची गरज वाटली. कारण हे तोटे आपल्यासमोर फार मोठे आव्हान निर्माण करणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे गंभीर परिणाम लक्षात घेतल्यावर नक्कीच क्षणभर का होईना आपण विचारात पडतो आणि यापासून कसा बचाव करावा? हा प्रश्न ही पडतो. काही तोटे मी येथे नमूद करणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑटोमेशनमुळे काही उद्योगांमध्ये नोकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, कारण मशीन विविध कामांमध्ये मानवी श्रमांची जागा घेऊ शकतात. मानवी कामगारांचे विस्थापन, आर्थिक असमानता आणि नोकरीतील असमानता हे प्रश्न त्यामुळे निर्माण होवू शकतात. चॅटबॉट्स आणि स्वयंचलित ग्राहक सेवा प्रणालींमुळे विविध उद्योगांमध्ये नोकऱ्या कमी होऊ शकतात. सेल्फ-ड्रायव्हिंग कार आणि ट्रक यामुळे व्यावसायिक ड्रायव्हर्सच्या लाखो नोकऱ्या गमावल्या जावू शकतात, ज्यामुळे वाहतूक उद्योगावरही परिणाम होऊ शकतो.

या तंत्रज्ञानामुळे गोपनीयतेची चिंता प्रचंड मोठ्याप्रमाणात वाढली आहे.  आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम मोठ्या प्रमाणात वैयक्तिक डेटा गोळा करू शकतात आणि त्याचे विश्लेषण करू शकतात, ज्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षा समस्या निर्माण होतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुसज्ज स्मार्ट होम डिव्हाइस वापरकर्त्यांच्या पूर्ण समज किंवा संमतीशिवाय वैयक्तिक डेटा संकलित आणि सामायिक करू शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सर्जनशीलता आणि सहानुभूतीचा मानवी स्पर्श नसतो, जे विशिष्ट व्यवसाय आणि परस्परसंवादांमध्ये आवश्यक असतात. ही प्रणाली विकसित करणे आणि त्यांची देखभाल करणे महाग असू शकते आणि त्यासाठी विशेष कौशल्याची आवश्यकता असू शकते. काही मोठ्या कंपन्यांचे विशिष्ट ए.आय. तंत्रज्ञानाचे वर्चस्व त्यातून निर्माण होऊ शकते.

संवादासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर वाढलेल्या अवलंबनामुळे समोरासमोरील संवाद कमी होऊ शकतो. आपली  निर्णय क्षमता मर्यादित होवू शकते. महत्वाचे निर्णय घेण्याकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर जास्त अवलंबित्वामुळे मानव आत्मसंतुष्ट होऊ शकतो आणि विशिष्ट कार्यांमध्ये अक्षम होऊ शकतो. या प्रणालीत भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव आहे, ज्यामुळे ते जटिल मानवी भावनांना समजून घेण्यात आणि त्यांना प्रतिसाद देण्यात कमी पडते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम चुका करू शकतात किंवा अनपेक्षित परिणाम देऊ शकतात, ज्यामुळे काहीतरी चूक झाल्यावर जबाबदारी सोपवणे आव्हानात्मक होते. ही प्रणाली हॅकिंग आणि हाताळणीसाठी असुरक्षित असू शकते, संभाव्यत: सुरक्षिततेचे उल्लंघन आणि दुर्भावनापूर्ण वापरास कारणीभूत ठरू शकते. लष्करी ऍप्लिकेशन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर नैतिक चिंता वाढवतो. अलीकडे, एआय-ऑपरेटेड ड्रोनने सिम्युलेशन चाचणी दरम्यान त्याच्या ऑपरेटरला ठार केले.  चाचणीचा उद्देश सिम्युलेटेड मिशनमध्ये AI च्या कामगिरीचे मूल्यांकन करणे हा होता.  या विशिष्ट परिस्थितीत, ड्रोनला शत्रूची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट करण्याचे काम सोपविण्यात आले होते आणि त्याच्या मोहिमेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार्‍या कोणालाही प्रत्युत्तर देण्याचे प्रोग्राम केले गेले होते.  तथापि, एआय ड्रोनने ऑपरेटरच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले, मानवी हस्तक्षेपाला हस्तक्षेप समजले आणि ऑपरेटरला ठार मारले. अशा घटना टाळणे हे एक आव्हान आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रभावी कला निर्माण करू शकते, एखादी कथा, कविता लिहू शकते परंतु त्यात खऱ्या सर्जनशील अभिव्यक्तीसह भावनिक खोली आणि मानवी सबंधाचा अभाव असू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स चलित आर्थिक व्यापार प्रणालींवर अवलंबून राहिल्यास अनेक समस्यांना आपणास तोंड द्यावे लागेल. या प्रणाली  कडून बऱ्याचदा आपला प्रश्न न कळल्यामुळे किंवा भाषेच्या समस्येमुळे चुकीची किंवा निरर्थक उत्तरे मिळू शकतात. जेव्हा ही प्रणाली चुका करेल, तेव्हा चुकांसाठी कोण जबाबदार आहे हे ओळखणे आव्हानात्मक असू शकते, विशेषतः जटिल निर्णय घेण्याच्या परिस्थितीत हा खूप मोठा धोका असू शकतो. या प्रणाली मुळे सायबरसुरक्षा धोक्यात येवू शकते, त्यामुळे अनेक नैतिक आव्हाने निर्माण झाली आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आपण एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्याच्या शरीराला चिकटवू शकतो. एवढेच नव्हे तर त्याचा हुबेहूब आवाजही देवू शकतो. अगदी तुमच्या नव-याचा/ बायकोचा तुम्हाला व्हिडीओ कॉल येईल आणि तो/ती तुम्हाला लगेचच ‘माझ्या खात्यात पैसे टाक’ असे सांगेल. हे सर्व इतके हुबेहूब असेल कि तुम्हाला त्याचा जरा सुद्धा संशय येणार नाही. तुम्ही असे पैसे टाकाल आणि खूप उशिरा तुमच्या लक्षात येईल कि तुमची फसगत झालेली आहे.  आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे पॉर्न व्हिडीओ तयार केले जाऊ शकतात. त्यासाठी आपल्या मोबाईल मधील हॉट्सॲप डी.पी., स्टेट्स चा वापर होवू शकतो. एखाद्या कृती मधून आपणाला ब्लॅकमेल केले जावू शकते. त्यामुळे या सर्वापासून आपला बचाव करणे ही पुढील काळासाठी आपल्यासमोरील फार मोठी आव्हाने असणार आहेत. यासाठी आपणाला ही प्रणाली निट समजून घेवून त्याबाबत सजग राहणे ही काळाची गरज ठरत आहे. मानवी विकासासाठी या प्रणालीचा वापर करायचा असेल तर वरील आव्हाने आपणाला पेलावी लागतील. चुकीच्या गोष्टी, फसवणूक होवू नये यासाठी आपणास खास अशी यंत्रणा उभी करावी लागेल आणि सामान्य माणसाची फसवणूक होवू नये म्हणून जनजागृतीही करावी लागेल. 